बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली


 बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

PL 2023 : नवी दिल्ली : 

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्यावैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे नाव अनेकदा भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडले गेले आहे. याशिवाय अनेकवेळा रिषभच्या नावावरून तिला ट्रोल देखील केले जाते. अलीकडेच आयपीएल २०२३ च्या सातव्या सामन्यात याचा प्रत्यय पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी दिल्लीचा माजी कर्णधार रिषभ पंतने हजेरी लावली होती.दरम्यान, रिषभ पंतच्या एका लेडी फॅनने उर्वशी रौतेलाला डिवचणारे पोस्टर झळकावले, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. "बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली", अशा आशयाचे पोस्टर पाहून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चांगलीच संतापली आहे. खरं तर मागील वर्षाच्या अखेरीस झालेल्या अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर असून शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत आहे. अशातच दिल्ली येथे झालेल्या आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पंतने मैदानात हजेरी लावली होती.

लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली:

मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात रिषभच्या लेडी फॅनने जे पोस्टर झळकावले होते ते उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये रिषभचा निम्मा फोटो देखील दिसत आहे. उर्वशीने हा फोटो पोस्ट करत म्हटले,"का?"

सोशल मीडियावर अनेक युजर्स या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी उर्वशीच्या समर्थनार्थ कमेंट केली आहे तर काही जण मजेशीर कमेंट करून यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघाने दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.





Comments

Popular posts from this blog

HISTORY OF INDIA

MH SET Result 2023 Maharashtra State Eligibility Test Cut Off