SPPU Results: ग्रेस मार्क्स संबंधात परीक्षा विभागाकडन स्पष्टता नाही, विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आवाहन

 SPPU Results: ग्रेस मार्क्स संबंधात परीक्षा विभागाकडन स्पष्टता नाही, विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आवाहन

SPPU Results: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निकाल लागणे सुरु आहे. आतापर्यंत 70 पेक्षा जास्त स्ट्रीम्स चे निकाल लागलेले आहेत. पुणे युनिव्हर्सिटीच्या या सेमिस्टर परीक्षेचे निकाल लागणे सुरु झाले आहे तेंव्हापासून विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स आणि इयर डाउन या बद्दल शंका आहे. बरेच विद्यार्थी असे होते ज्यांना ग्रेस मार्क्स मिळाले असते तर ते पास झाले असते. खूप सारे विद्यार्थी असे होते बऱ्याच विषयात नापास झाले होते परंतु त्यानां ग्रेस मार्क्स, डॉलर, हॅशटॅग वाले चिन्ह मिळाले तेंव्हा ते आनंदी होते. काही विद्यार्थ्यांचे एवढे विषय बॅक राहिले कि त्यानां इयर डाउन होण्याची भीती वाटत होती.



युवक क्रांती दलाचे पुणे अध्यक्ष सचिन पांडुळे आणि आलसी इंजिनियर युट्युब चॅनेल चे Prof. रोनक सर यांनी पुणे युनिव्हर्सिटी च्या परीक्षा केंद्राला शनिवारी भेट दिली. रौनक सर सांगतात, “परीक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला बिलकुल थोडी माहिती सांगितली. पुणे युनिव्हर्सिटी च्या परीक्षा केंद्रात कोणतीही अशी व्यक्ती नव्हती ज्यांनी आमच्या ग्रेस मार्क्स आणि इयर डाउन संबंधित प्रश्नाचे निरसन केले. कोणाला ग्रेस मार्क्स मिळू शकतात? कोणाला नाही मिळू शकत. हॅशटॅग आणि डॉलर चिन्ह कधी वापरात? या सगळ्या प्रश्नांमध्ये गोंधळ विद्यापीठ आधिकारींना सुद्धा होता "

आता ह्या सगळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी आपणाला काय करायला हवे? सगळ्यात पहिले महाविद्यालयाकडे एक लेटर कॉपी असते. यात विद्यार्थ्यांचे इनसेम, एन्डसेम चे मार्क्स आणि इंटर्नल मार्क्स दिले असतात. हे तुम्हाला रिजल्ट लेझर वरून बघता येईल. विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक आपल्या महाविद्यालयात परीक्षा अधिकाऱ्यांशी भेटून रिजल्ट लेझर ची मागणी करता येईल. त्यामध्यें तुम्हाला तुमचे सविस्तर गुणांकन बघता येईल.

रोनक सर सांगतात कि ग्रेस मार्क्स किती मिळतात. आणि केव्हां मिळतात या बद्दल अजूनही पूर्ण माहिती विद्यापीठाकडून मिळालेली नाही. डॉलर आणि हॅशटॅग चिन्ह कशासाठी वापरतात या बद्दल पुढच्या आठवड्यात पूर्ण माहिती मिळेल. इथे त्यांनी विद्यार्थ्यांना अजून एक आवाहन केले आहे. ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एका विषयात पास होण्यासाठी 4 पेक्षा कमी गुण पाहिजे त्यांनी लेजर कॉपीचा फोटो आणि मोबाईल नंबर त्याच्या इंस्टाग्राम ID वर पाठवून द्यावा. जेणेकरून अशा सर्व विद्यार्थ्यांच्या लेझर कॉपी ची प्रिंटआउट घेऊन विद्यापीठ अधिकाऱ्याशी या बाबत चर्चा करता येईल.

Comments

Popular posts from this blog

HISTORY OF INDIA

MH SET Result 2023 Maharashtra State Eligibility Test Cut Off