SPPU Special Exam: पुणे युनिव्हर्सिटी ची पुनर्परीक्षा जाहीर, कधी आणि कुठे होणार परीक्षा? जाणून घ्या
SPPU Special Exam: पुणे युनिव्हर्सिटी ची पुनर्परीक्षा जाहीर, कधी आणि कुठे होणार परीक्षा? जाणून घ्या
पुणे:
पुणे युनिव्हर्सिटी ने काल दिनांक 6 एप्रिल रोजी स्पेशल एक्साम म्हणजेच पुनर्परीक्षा बाबत एक वेळापत्रक जाहीर केले. आता हे वेळापत्रक नेमके कुणासाठी आहे? परीक्षा कधी होणार आणि कुठे होणार अशा महत्वाच्या प्रश्नांबाबत तुम्हाला माहिती मिळणार आहे. विद्यापीठाच्या री-एक्साम या 17 एप्रिल पासून सुरु होत आहे. त्या पहिले तुम्हाला या स्पेशल परीक्षांचे वेळापत्रक युनिव्हर्सिटी च्या अधिकृत साईट वर पाहता येईल.
वेळापत्रक तुम्ही पहिले असेलच. आता हे हि जाणून घ्या हि परीक्षा कुणासाठी आहे आणि कुठे होणार आहे? परीक्षेसाठी विद्यापीठाने येथे 3 वेगवेगळे एक्साम सेंटर नमूद केले आहे. पुणे, नगर आणि नाशिक मध्ये हे एक्साम सेंटर्स दिले आहे. याच परीक्षा केंद्रावर या स्पेशल एक्साम घेतल्या गेल्या जाणार आहे.
कुठे आणि कुणासाठी होणार स्पेशल एक्साम ?
ज्या कॉमर्स स्ट्रीम्स च्या विद्यार्थ्यांचे competitive exams एक्साम होते. बी. कॉम च्या विद्यार्थ्यांसाठी CA, CS, CMA परीक्षा, एम.कॉम च्या विद्यार्थ्यांसाठी MPSC, UPSC किंव्हा यामध्ये स्पोर्ट्स, कल्चरल NCC अशा प्रकारचे कार्यक्रम आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थी युनिव्हर्सिटी च्या परीक्षा देऊ न शकल्याने ह्या स्पेशल एक्साम्स घेण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी रीतसर स्पेशल एक्साम साठी आपल्या महाविद्यालयात अर्ज केलेला होता. फक्त अशाच विद्यार्थ्यांना स्पेशल एक्साम किंव्हा री-एक्साम देता येणार आहे.

Comments
Post a Comment